तू कोण आहेस?.....
स्वयंपाक आणि इतर कामे करून झाल्यावर शिल्पा आज नेहमी प्रमाणे बोलली नाही हसली नाही जरा खटकलच म्हणून तिला जवळ बसवून घेतले आणि कारण विचारले तसे डोळ्यात पाणी आलं होतं म्हणाली आज्जी मी शिकले असते तर मला चांगली नोकरी मिळाली असती...माझ्या लक्षात आलं की मनात कसली तरी खंत आहे म्हणून एक छोटासा प्रयत्न केला .बघ तो समोरचा देवीचा फोटो पाहिलास ना अगदी तशीच तू देखिल अष्टभुजा आहे. ती माझ्या कडे बघून हसली. तुला पटत नाही ना मग ऐक. रागात बोलत होत्या—
गेल्या महिन्यात तुझ्या नवर्याला अपघात झाला होता. आणि तुझी परिस्थिती नव्हती मोठ्या दवाखान्यात दाखल करण्याची. पण तू घाबरली नाहीस. उलट चार घरची कामे जास्त मिळवून घरीच सेवा शुश्रूषा केली. चांगले चुंगले खाऊ घातलेस पंधरा दिवसांत नवरा ठणठणीत झाला. एवढेच नव्हे तर मुलांना देखिल चांगले खाऊ घालतेस वेळी जेवण तेही गरम हेच काम करतात ना डॉक्टर? पैसा वाचवणे म्हणजेच मिळवणे असते.त्र घर पाहिजे!"
तुझ्या चाळीत शेजारचे नवरा बायको सारखे भांडायचे. मारझोड दारु पिऊन धिंगाणा. त्यात मुलांचे हाल झाले होते. शेवटी प्रकरण हाताबाहेर गेली. पोलीसात तक्रार दिली दोघांनी. आणि घटस्फोट घेण्यासाठी दोघेही सरसावले होते. तेव्हा तघेणा