एक शिंपला...
खूप वर्षे झाली..औरंगाबादला येऊन राधाला..रानडे काकांच्या घरात भाड्यानं रहायचे हे लोक..
कॉलनी तशी खूपच छान.. त्याकाळात .लोकांनी भरलेली..
आतासारखी भकास वाटणारी नाही..कॉलनीत प्रवेश केला आणि तिच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..
खूपच बदल झाला होता सगळीकडेच.ती रहात असलेल्या घराला शोधत होती तिची नजर..पण खूप वर्षे झाल्यामुळे ती रहात असलेलं नेमकं घर सापडत नव्हतं..
पण काही आठवणी आपण कितीही सोडायच्या म्हणल्या तरी त्या ,मनाच्या कोपऱ्यात अगदी गच्च असतात..तशा त्या कॉलनीच्या,घराच्या..खरं तर रानडे काका ते घर केव्हाच विकून पुण्यात गेलेले..
खरं तर रानडे काकांपेक्षा आजूबाजूला रहाणारे..कुलकर्णी,उपाध्ये,वैद्य, अशी कितीतरी आडनावं तिला जास्त जवळची वाटत होती..आणि आज याच सगळ्यांना बघण्यासाठी तिचं मन आतुरलं होतं..
शेवटी एकदाचं ते घर सापडलं..तिचं तिलाच आश्चर्य वाटलं..किती बदल होतो ना सगळ्याच गोष्टीत..ती शोधत असलेले चेहरे..
कसे दिसत असतील, इतक्या वर्षांनी ओळखतील का आपल्याला..अनेक प्रश्न..कारण पूर्वी जे वातावरण होतं आता खरंच तसं राहिलं नाही आहे..
ती घाबरत घाबरत कुलकर्णींच्या घराजवळ येऊन उभी राहिली..कुलकर्णींची तीन मुलं.. त्यांचा ल